Spartan Monsoon League’ : सॅफरॉन क्रिकेट क्लब, रायझिंग स्टार्स क्लब संघांचा पाचवा विजय

एमपीसी न्यूज – स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मॉन्सून लीग’ अजिंक्यपद टी- 20 क्रिकेट स्पर्धेत सॅफरॉन क्रिकेट क्लब आणि रायझिंग स्टार्स क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून पाचव्या विजयाची नोंद केली.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सॅफरॉन क्रिकेट क्लबने ब्राईट इलेव्हन क्लबचा 6 गडी राखून सहज पराभव करत स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद केली.पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्राईट इलेव्हन क्लबचा डाव 78 धावांवर गडगडला.शाम यादव याने सर्वाधिक 23 धावांचे योगदान दिले.सॅफरॉन क्रिकेट क्लबच्या नचिकेत कुलकर्णी याने 12 धावात 3 गडी बाद करून भेदक गोलंदाजी केली.यासह क्रीष्णा भट (3 – 13) आणि श्रीपाद भागवत (2-15) यांनीही अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. हे आव्हान सॅफरॉन क्रिकेट क्लबने 10 षटकात पूर्ण केले.

अभिषेक कौशिक याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रायझिंग स्टार्स क्लबने स्पाटर्न क्रिकेट क्लबचा 6 गडी राखून पराभव केला.पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पाटर्न क्रिकेट क्लबचा डाव 17.4 षटकामध्ये 94 धावांवर आटोपला.पार्थी नाईकर याने 33 धावा केल्या.अभिषेक कौशिक (3-16), रविंद्र पाटील (3-8) आणि गौरव बाबर (3 – 22) यांनी अचूक गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाचा डाव मर्यादित ठेवला.रायझिंग स्टार्स क्लबने 10.2 षटकात व 4 गडी गमावून आवश्यक धावा पूर्ण केल्या.आदित्य कदम (30धावा), अभिषेक कौशिक (नाबाद 29 धावा) आणि निखील जैन (नाबाद 26 धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी : 

ब्राईट इलेव्हन क्लब : 15.2 षटकात 10 गडी बाद 78 धावा (शाम यादव 23, निनाद फाटक 13, नचिकेत कुलकर्णी 3 – 12,  क्रीष्णा भट 3 – 15, श्रीपाद भागवत 2 – 15) पराभूत वि. सॅफरॉन क्रिकेट क्लबः 10 षटकात 4 गडी बाद 79 धावा (शुभम खटाळे 25, हृषीकेश मत्स्ये 16, हर्ष ईनामदार 1-3); सामनावीरः नचिकेत कुलकर्णी;

स्पाटर्न क्रिकेट क्लब : 17.4 षटकात 10 गडी बाद 94 धावा (पार्थी नाईकर 33, विवेक कुबेर 16, अभिषेक कौशिक 3 – 16, रविंद्र पाटील 3 – 8, गौरव बाबर 3 – 22) पराभूत वि. रायझिंग स्टार्स क्लबः 10.2 षटकात 4 गडी बाद 98 धावा (आदित्य कदम 30, निखील जैन नाबाद 26, अभिषेक कौशिक नाबाद 29, पार्थी नाईकर 2 – 10); सामनावीरः अभिषेक कौशिक.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.