Chinchwad Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी अटकेत 

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. जानेवारी 2020 ते 4 फेब्रुवारी 2021 दरम्यान चिंचवड परिसरात हि घटना घडली. 

नितीन अशोक सोळंके (वय 27, रा. दळवी नगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने शुक्रवारी (दि.21) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले व वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दाखल फिर्यादी वरुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.