Pune : पुण्यात शरद पवार यांचे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

एमपीसी न्यूज  : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.(Pune) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल ताशाचा गजरात आनंदोत्सव साजरा केला. राजीनामा मागे घेतल्यानंतर पुण्यातील निवासस्थानी शरद पवार यांच आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले . यावेळी शरद पवार यांच्या सोबत पत्नी प्रतिभा पवार,आमदार रोहित पवार होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा शरद पवार यांनी तीन दिवसापूर्वीच मुंबईत झालेल्या लोक माझे सांगती पुस्तक प्रकाशन सोहोळ्या वेळी केली . शरद पवार यांनी तो निर्णय मागे घ्यावा यासाठी राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नेत्यांची समिती नेमण्यात आल्यानंतर त्या समितीने शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावला. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास शरद पवार यांनी निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

NCP : कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केल्याबद्दल पवार साहेबांचे आभार – अजित गव्हाणे

त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला.शरद पवार यांच्या या घोषणेनंतर राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी एकच जल्लोष केला.या सर्व घडामोडीनंतर शरद पवार हे मुंबई येथून पुण्याच्या दिशेने रवाना झाले. (Pune) त्याबाबत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच शिवाजीनगर येथील निवासस्थानी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि ताशांच्या गजरात शरद पवार यांचे स्वागत केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.