T20 WC : T20 वर्ल्ड कप संघात मराठमोळ्या शार्दुल ठाकूरचा समावेश

एमपीसी न्यूज – आगामी T20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. मराठमोळा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर याला 15 सदस्यीय भारतीय संघात जागा मिळाली आहे. शार्दुलने अक्षर पटेलची जागा घेतली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नवा भारतीय संघ जाहीर केला आहे.

पहिल्यांदा वर्ल्डकप संघ जाहीर झाला, तेव्हा शार्दुल स्टँडबाय खेळाडूंमध्ये होता. आता अक्षरने त्याची जागा घेतली आहे. इंग्लंड दौरा आणि त्यानंतर आयपीएल 2021 मध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर शार्दुलने निवड समितीला विचार करण्यास भाग पाडले.

असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी हे खेळाडू असतील.  तर, स्टँड-बाय म्हणून श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल असे दोघे खेळाडू असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.