CM : शिवसेना-भाजपची युती एवढी कच्ची नाही, एखाद्या …

एमपीसी न्यूज – एका विचाराने शिवसेना-भाजपची युती झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली युती आहे. त्यामुळे एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर काही परिणाम होणार नसल्याचे (CM) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Bhosri : भोसरी आगारात बिरसा मुंडा पुण्यतिथी निमित्त अभिवादन

थेरगावातील शासन आपल्या दारी या उपक्रम कार्यक्रमात (CM) मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहोत. आम्ही चांगले काम करत आहोत, म्हणून कुणी तरी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणामध्ये मोदी यांना ८४ टक्के लोकांनी पसंती दिली, याचा मला आनंद आहे.

जगभरात लोकप्रियतेमध्ये मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. याचा आम्हाला जास्त आनंद आहे. आपल्या देशाचे नाव जगात उंचाविण्याचे काम मोदी यांनी केले आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते घाबरले आहेत. आम्ही विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तरे देणार आहोत.

एकही लाभार्थी वंचित राहणार नाही ही शासनाची भूमिका आहे. ९५ हजार ९६४ लाभार्थी अर्ज केले आहेत. आतापर्यंत ३५ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना थेट लाभ वाटला आहे. ११ महिन्यातील निर्णय वाचायला वेळ पुरणार नाही. एवढे निर्णय घेतले. काही निर्णय पहिल्यांदा घेतले.

एसटी बसमध्ये महिलांना ५० टक्के तर जेष्ठांना मोफत बस प्रवास सुरु केला. या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना फायदा झाला. शेतकऱ्यांना केंद्र सरकार वर्षाला सहा हजार आणि राज्य सरकार सहा हजार असे वर्षाला बारा हजार रुपये दिले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.