Pimpri : शिवसेना उपनेते हाजी अरफात शेख यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे हाजी अरफात शेख यांनी अखेर काल रात्री उशिरा भाजपात प्रवेश केला.
भाजपने अल्पसंख्याक आयोगाचं अध्यक्षपद हाजी अरफात यांना देताच त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला.

हाजी अरफात शेख यांनी अनेक वेळा शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. नियुक्त्या वाद सुरु असताना, फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.