Chinchwad News : चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – नगरसेविका मीनल यादव व शिवसेना शाखा मोहननगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज 14 नोव्हेंबर रोजी बाल दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मोहननगर येथील अनुसया बाबर उद्यान येथे आज (रविवारी) सकाळी 10 वाजता ही स्पर्धा सुरू करण्यात आली. ज्येष्ठ उद्योजक श्रीनिवास मैत्रे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत मोहननगर, काळभोर नगर, रामनगर, फुलेनगर परिसरातील 321 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी लहान मुलांकडून अतिशय सुंदर, समाजाला संदेश देणारी चित्र रेखाण्यात आले. अनेक स्पर्धकांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशा थोर महापुरुषांची सुद्धा चित्र रेखाटली.

स्वच्छ भारत ,करुणा वॉरियर्स ,पृथ्वी वाचवा अशा अनेक विषयांवर चित्र रेखाटण्यात आली.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक टॅब , दुसरे पारितोषिक स्मार्टवॉच व तिसरे बक्षीस क्रिकेट बॅट व उत्तेजनार्थ नार्थ बॅडमिंटन रॅकेट ,सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

या स्पर्धेचे आयोजन नगरसेविका मीनल यादव, पिंपरी-चिंचवड शिवसेना संघटक विशाल यादव यांनी केले. शाखाप्रमुख नागेश नामदेव, विभाग प्रमुख शशिकांत पाडळे, दीपक महाराणा, संजय सुर्वे ,रोहित खजिनदार, माऊली सुतार ,मनोज मोहिते, अभिषेक येवले, योगेश बाबर ,सुमित धुमाळ, कल्पेश घुले ,स्वप्नील येवले, असे अनेक शिवसैनिक, पालक या स्पर्धेत उपस्थित होते. सूत्रसंचालन पंकज लिंगे यांनी केले. आभार प्रदर्शन गौरव कासार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.