Pune – पतसंस्थेचे शटर फोडून 30 हजाराचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पतसंस्थेचे शटर फोडून 30 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना अजित नागरी सहकारी पतसंस्था काल(दि.1) पहाटे चारच्या सुमारास घडली.

याप्रकरणी रमाकांत राणे(वय 33, रा. आंबेगाव-बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित नागरी सहकारी पतसंस्थेचे शटर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून शटर उचकटून पतसंस्थेमधील चांदीच्या 13 वस्तू, 10 हजार 898 रूपयांची रोकड, सीसीटीव्ही, डीव्हीआर असा एकूण 27 हजार 298 रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.