Wakad News : खाजगी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली सहा लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने महिलेच्या नकळत तिचे अश्लील व्हिडीओ काढले. ते महिलेला पाठवून इतर ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे सहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

राजीव पटेल उर्फ राजीव परमार (रा. मगरपट्टा, पुणे) याच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 34 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता रहाटणी परिसरात घडला आहे. आरोपीने फिर्यादी महिलेच्या शरीरसंबंधाचे व्हिडीओ बनवले. ते व्हिडीओ महिलेच्या व्हाट्स अपवर पाठवले. ते व्हिडीओ बाहेर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे सहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.