Hackathon competition : स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत पीसीसीओईआर महाविद्यालयाचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज : भारतीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोवेशन सेल व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022′ स्पर्धेत पिंपरी चिंचवड (Hackathon competition) एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च महाविद्यालयातील (पीसीसीओईआर) दोन संघाने प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले आहे.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. अच्युत खरे आणि प्रा. जमीर कोतवाल यांनी काम केले. प्रा. सोनाली लुनावत, प्रा.निलेश कोरडे, अभिजीत देवगिरीकर, संगणक विभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्चना चौगुले यांनी मार्गदर्शन केले.

Pune poetry play : ‘मी शांता आजी’ काव्यनाट्यातून मुलांनी लुटला आनंद

दोन्ही संघाचा एआयसीटीईने एक लाख रुपये बक्षिस आणि प्रमाणपत्र देवून गौरव केला.  नमक्कल तामीळनाडू येथे झालेल्या स्पर्धेत पीसीसीओईआरच्या “सुगम शिक्षा” (Hackathon competition) या संघाने सॉफ्टवेअर एडिशन मध्ये अंतिम फेरीत नेहा भेगडे हिच्या नेतृत्वाखाली अथर्व निंबाळकर, अभिषेक खाचणे, ओम चिमणपुरे, रितिका भोईटे आणि आदित्य बिले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

तर कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत “8 बीट” या संघाने सॉफ्टवेअर एडिशन मध्ये (Hackathon competition) अंतिम फेरीत टीम लीडर आगम बोथरा याच्या नेतृत्वाखाली सिद्धी शितोळे, प्रकाश शर्मा, धैर्यशील मेश्राम, अभिजीत जाधव आणि विश्वतेज सरवळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.