Pune Crime : पिण्यासाठी पाणी न दिल्याने सलून मालकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : पिण्यासाठी पाण्याची बॉटल मागूनही न दिल्याने तिघा जणांनी सलून मालकावर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलाय.(Pune Crime) आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रोडवरील शिवस्व मेन्स पार्लर समोर 11 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोन्या कांबळे, गोविंद लोखंडे यांच्यासह एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल पंढरीनाथ तावरे (वय 27) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune News : हडपसर परिसरातून बेपत्ता असलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून खून

या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी यांचे जांभुळवाडी रस्ता परिसरात सलूनचे दुकान आहे. आरोपींनी त्यांच्या दुकानात येऊन पिण्यासाठी पाण्याची बॉटल मागितली होती. मात्र फिर्यादी यांनी पाण्याची बॉटल नाही असे आरोपींना सांगितले होते.(Pune Crime) त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून धमकी दिली होती. त्यानंतर फिर्यादी हे रात्रीच्या वेळी दुकानात असताना तीनही आरोपींनी दुकानात येऊन त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर अनोळखी असलेल्या आरोपीने फिर्यादी यांना ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्या डोक्यात आणि गळ्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.