Alandi News : हिंदूंनी पक्ष आणि जाती यांमध्ये न अडकता भारतीय म्हणून संघटित झाले पाहिजे – अमृताश्रम स्वामी महाराज

एमपीसी न्यूज – हिंदूंनी पक्ष आणि जाती यांमध्ये न अडकता भारतीय म्हणून संघटित झाले पाहिजे. हिंदूंनी धर्माविषयी चर्चा करायला हवी,(Alandi News) असे प्रतिपादन पू. श्री अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांनी येथे आयोजित केलेल्या वारकरी महाअधिवेशनात केले. 

आळंदी येथे सोमवारी (दि.21) श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा येथे श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य राज्यव्यापी सोळावे वारकरी महाअधिवेशन’ उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनाला सहस्रों वारकर्‍यांची उपस्थिती होती. या अधिवेशनात महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात यावा,गड आणि दुर्ग यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवावी अशी वारकऱ्यांनी एकमुखी मागणी केली.

Pimpri : आंतरशालेय हॉकी स्पर्धेत लॉयला आणि सेंट जोसेफ प्रशाला विजेते

सर्व तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालावी, पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रांयणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, सर्व मंदिरे सरकारच्या कचाट्यातून मुक्त करावीत, बियरबार, मटण दुकानांना देवता आणि गडकोटांची नावे देऊ नयेत, (Alandi News) महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची स्थापना करण्यात यावी, हलाल शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा, यांसह 16 ठराव संमत करण्यात आले.महाअधिवेशनात झालेल्या ठरावांचे निवेदन तयार करून वारकर्‍यांच्या वतीने ते मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

या अधिवेशनात बोलतांना ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले की, हिंदूंवरील आघातांच्या विरोधात हिंदू जागृत झाला पाहिजे, गोहत्या बंदी कायदा झालाच पाहिजे.(Alandi News) गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून हिंदूंनी स्वतःची ताकद दाखवून दिली पाहिजे. पू. श्री द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर म्हणाले की, कीर्तनकारांनी संप्रदायाची आचारसंहिता बाळगून कीर्तनातून धर्माचे ज्ञान दिले पाहिजे, असेही मत व्यक्त केले.

अरुण महाराज पिंपळे आणि ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी केले. अधिवेशनाची सांगता पसायदानाने झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.