Thailand Para Badminton : थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुकांत कदमला दुहेरीत विजेतेपद, एकेरीत उपविजेता

एमपीसी न्यूज : जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या सुकांत कदम याने थायलंड पॅरा बॅडमिंटन (Thailand Para Badminton) स्पर्धेत दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली. एकेरीत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

जाकार्ता येथे झालेल्या या स्पर्धेत एसएल 4 गटातील एकेरीच्या अंतिम लढतीत सुकांतला द्वितीय मानांकित आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या फ्रान्सच्या लुकास मझूरकडून 21-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. एकेरीत सुकांतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. मझूरविरुद्ध तो नववी लढत हरला. सुकांत त्याच्याविरुद्ध एकच लढत जिंकू शकला आहे.

त्यानंतर भारताचा टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगतच्या साथीत सुकांतने दुहेरीत सुवर्णपदक मिळविले. सुकांत-प्रमोद जोडीने द्वितीय मानांकित ड्वियोको-फ्रेडी सेटिवान जोडीचा 29 मिनिटांत 21-18, 21-13 असा पराभव केला. कारकिर्दीमधील सुकांतचे दुहेरीतील दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी त्याने 2018 मध्ये युगांडा येथील स्पर्धेत विक्रम कुमारच्या साथीत विजेतेपद मिळविले होते.

Kalapini : कलापिनी बाल भवनच्या बालकांनी दहीहंडी केली उत्साहात साजरी

पुनरगमनानंतर मिळालेल्या यशावर मी निश्चित (Thailand Para Badminton) समाधानी आहे. अंतिम फेरीत पराभूत होणे नेहमीच निराशाजनक असते. लुकास तगडा प्रतिस्पर्धी आहे. एका दर्जेदार खेळाडूकडून मी हरलो, असे सुकांत म्हणाला. थायलंड स्पर्धेतील ही माझी सर्वोत्तम कामगिरी ठरली. एकेरीत उपविजेतेपद आणि दुहेरीत विजेतेपद आनंद देणारे आहे. प्रमोदबरोबर खेळण्याचा वेगळाच आनंद असतो. तो अनुभवी आणि जिद्दी आहे. त्याच्याबरोबर खेळताना आज लय गवसली आणि स्पर्धेची विजयी अखेर केली, असेही तो म्हणाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.