Pimpri News : प्लास्टिकमुक्त पिंपरी-चिंचवड अभियानांतर्गत रविवारी प्लॉगेथॉन मोहिम

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने ‘प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड’ अभियानाअंतर्गत ‘ग’आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आज (रविवारी, दि. 29) प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात आली.

ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत थेरगाव, पिंपरी, रहाटणीगाव, डांगे चौक येथे “प्लास्टिक मुक्त शहर विशेष मोहीम” राबण्यात आली. प्लॉगेथॉन मोहिम राबवून रस्त्यालगत तसेच परिसरात असलेला प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त तथा स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक रविकिरण घोडके, ग क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे, प्रशासन अधिकारी राजेश ठक्कर, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू बेद, वसंत सरोदे तसेच महिला बचत गट, स्वयंसेवक, सामाजिक संघटनांचे सदस्य, विद्यार्थी आणि नागरिक आदी सहभागी झाले.

ह क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एच. ए ग्राउंड, संत तुकारामनगर, दापोडी, प्रभाग क्र. 31 व 32 येथे “प्लास्टिक मुक्त शहर विशेष मोहीम” राबवून प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. यावेळी पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता पर्यावरण संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त तथा स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक रविकिरण घोडके, ह क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त प्रशासन बाळासाहेब खांडेकर, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, बचत गटांचे सदस्य, स्वयंसेवक, सामाजिक संघटनांचे सदस्य, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.

महापालिकेच्या वतीने शहरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 25 मे ते 5 जून या कालावधीत “प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड” ही मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शहरात प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्लॉगेथॉन मोहिमे अंतर्गत प्लास्टिक कच-याचे संकलन करण्याचे काम शहरात सुरु झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.