Talegaon : सुनील शेळके यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी

एमपीसी न्यूज – लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान (मावळ), माय मावळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, तळेगांव दाभाडे नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांचा आभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सुनील शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वच पक्षातील नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.

पहाटे तळेगाव येथील मारुती मंदीर येथे शनी महाराजांना अभिषेक करण्यात आला. नंतर श्रीक्षेत्र देहूगाव येथे जगद्गुरु संत तुकराम महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम दिवसभर झाला. यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, पुणे जिल्हा भाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर, पुणे जिल्हा संघचालक सुरेशभाई शहा, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिगंबर भेगडे, जेष्ठ नेते चंद्रकांत सातकर, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, अलका धनविले, मावळ पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, लोणावळा नगरपरिषदच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, वडगावचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, नामवंत पैलवान मंगलदास बांदल, भंडारा डोंगर दशमी समितीचे प्रमुख बाळासाहेब काशिद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, भाजपा तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी माजी अध्यक्ष गणेश ढोरे, भाजपा युवा मोर्चा मावळ तालुका अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रविंन्द्र भेगडे आदी उपस्थित होते.

तळेगांव, वडगांव, लोणावळा, देहुरोड नगरपरिषदचे नगरसेवक, नगरसेविका, तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सुनील शेळके यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सुनील शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारा रस्ता गर्दीमुळे दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सुनील शेळके यांनी आजवर केलेल्या कामाची पावती नागरिकांनी यानिमित्ताने दिल्याचे पाहायला मिळाले. हजारो लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.