Talawade : तळवडे फायर कॅंडल कंपनीतील आग प्रकरणी एकाला अटक तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तळवडे रेड झोन मधील अनधिकृत शिवराज एन्टरप्रायझेस (Talawade)येथे ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँडल) तयार करणाऱ्या कारखान्यात काम सुरू असताना शुक्रवारी (दि.8) अचानक भडका उडाल्याने झालेल्या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यु झाला. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी एकाला अटक केली असून दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

नजीर अमिर शिकलगार (रा.मोहननगर, चिंचवड) असे अटक (Talawade)आरोपीचे नाव आहे, याबरोबरच एक दोन महिला आरोपी, शरद सुतार यांच्यावर देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस ठाण्यात अग्निशमन दलाचे अधिकारी बाळासाहेब विश्वनाथ वैद्य यांनी फिर्याद दिली आहे.

 

Talawade : तळवडे आग प्रकरणातील मृत्यू झालेल्या कामगारांचा वारसांना 10 लाखांची मदत करा – छाया सोळंके-जगदाळे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वालाग्राही पदार्थ वापरन्याचा कोणताही परवाना नसताना बेकायदेशीर रित्या शिवराज एन्टरप्राय़जेस, राणा फॅब्रीकेशन कंपनी ही आतील बाजूस फायर कॅन्डल बनवत होती. ज्यावेळी ज्वालाग्राही पदार्थाचा भडका उडला यात सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेता त्यांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा परिस्थीत कामगारांना काम करण्यास भाग पाडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकऱणी हा गुन्हा दाखल केला असून देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.