Talegaon Dabhade : खोटे लग्न करत तरुणीची फसवणूक

एमपीसी न्यूज – खोटे लग्न करून तरुणीशी शारीरिक संबध प्रस्थापीत करत तिची फसवणूक करणाऱ्या विरोधात तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रेयस श्रीराम पेंडसे (वय 29 रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव) असे आरोपीचे नाव असून तरुणीने या विरोधात शनिवारी (दि.13) पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडीतेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी खोटे लग्न केले देखील. याचाच गैरफायदा घेत 4 नोव्हेंबर 2017 ते 5 ऑगस्ट 2022 या कालावधीत तिच्याशी शारीरिक संबध प्रस्थापित केले.पिडीतेला तिची फसऴणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.