Air India : एअर इंडियाने सुरू केली पुणे व अहमदाबाद दरम्यान पहिली थेट विमानसेवा

एमपीसी न्यूज : एअर इंडिया (Air India) या भारतातील आघाडीच्या विमान कंपनीने पुणे व अहमदाबाद शहरांदरम्यान आपली पहिली थेट विमानसेवा 20 ऑगस्ट 2022 पासून सुरु करत असल्याची घोषणा आज केली. भारतातील दोन स्मार्ट शहरे आणि वाणिज्यिक व शैक्षणिक केंद्रे म्हणून वेगाने विस्तार पावत असलेल्या पुणे व अहमदाबाद दरम्यान हवाई कनेक्टिव्हिटीची मागणी पूर्ण करण्यासाठी एअर इंडियाने या नव्या मार्गाचा समावेश आपल्या नेटवर्कमध्ये करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाचे विमान 0481 अहमदाबाद विमानतळावरून सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी निघून पुणे विमानतळावर दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल. त्याचप्रमाणे विमान एआय 0482 पुणे विमानतळावरून दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी निघून अहमदाबाद विमानतळावर दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. या दोन शहरांदरम्यान हवाई प्रवासाला लागणारा अंदाजे वेळ 85 ते 95 मिनिटांचा असेल.

PCMC : तृतीयपंथीयांच्या शलाका पथकाला कर वसुलीचे काम

कोविड-19 महामारी आणि इतर काही कारणांस्तव दीर्घकाळापासून बंद ठेवण्यात आलेले एअर इंडियाचे विमान पुन्हा सेवेत आणण्यात आल्यामुळे पुणे व अहमदाबाद हा नवा मार्ग सुरु करणे शक्य होत आहे.

एअर इंडियाचे (Air India) एमडी व सीईओ श्री. कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “महाराष्ट्र आणि गुजरातेतील दोन महत्त्वाची प्रगती केंद्रे असलेल्या पुणे व अहमदाबाद दरम्यान विमानसेवेचा शुभारंभ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  एअर इंडियाच्या देशांतर्गत कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा घडवून आणणारे आणि आमच्या प्रवाशांना सुविधाजनक प्रवासाचे अजून जास्त पर्याय उपलब्ध करवून देऊन अधिक सक्षम बनवणारे हे पुढचे पाऊल आम्ही उचलत आहोत. येत्या काही महिन्यांमध्ये आमची अजून विमाने सेवेत परत येतीलत्यामुळे आम्ही अजून नवे मार्ग सुरु करून आमच्या देशांतर्गत कनेक्टिव्हिटीमध्ये अजून जास्त वाढ करू शकू.”    

एअर इंडियाच्या नॅरोबॉडी ताफ्यामध्ये सध्या 70 एअरक्राफ्ट्स असून त्यापैकी 54 सध्या सेवा देण्यायोग्य सक्षम आहेत. उर्वरित 16 एअरक्राफ्ट्स 2023 च्या सुरुवातीच्या महिन्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने सेवेत येतील.

20 ऑगस्ट 2022 पासून अहमदाबादपुणे शेड्युल

फ्लाईट डिजाईनविमान इथून निघणारविमान निघण्याची वेळविमान इथे पोहोचणारविमान पोहोचण्याची वेळप्रकार
एआय  0481अहमदाबाद10.45पुणे12,10नवीन

२० ऑगस्ट २०२२ पासून पुणेअहमदाबाद शेड्युल

फ्लाईट डिजाईनविमान इथून निघणारविमान निघण्याची वेळविमान इथे पोहोचणारविमान पोहोचण्याची वेळप्रकार
एआय   0482पुणे12.40अहमदाबाद14:15नवीन

अधिक माहितीसाठी कृपया www.airindia.in ला भेट द्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.