Talegaon Dabhade : वानप्रस्थाश्रम येथे करण शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप

एमपीसी न्यूज- युवा उद्योजक पै. करण प्रतापराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त तपोधाम कॉलनी येथील वानप्रस्थाश्रम येथे स्वराज्य मित्र मंडळ तळेगाव स्टेशन व पै.करण (आण्णा) शेळके मित्र परिवार यांच्या सयुंक्त विद्यमाने फळवाटप व अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके व नगरसेवक संदीप शेळके तसेच स्वराज्य मित्र मंडळाचे कार्यकर्ते व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

  • वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून साधेपणाने वाढदिवस साजरा करून युवा पिढीसमोर हा एक चांगला आदर्श निर्माण केला. सुनील शेळके यांनी या उपक्रमाचे कौतक करून भावी आयुष्यात असेच समाज कार्य करत रहावे अशी शुभेच्छा व्यक्त केली. करण शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.

संदीप शेळके यांनी स्वागत केले. वानप्रस्थाश्रमचे सचिव उर्मिला छाजेड यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.