Talegaon Dabhade :  कलापिनीचा 46 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

”कलापिनीचा 46 वा वर्धापनदिन लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या उपस्थितीत साजरा

एमपीसी न्यूज : जास्तीत जास्त पहा, वाचा, बघा, अनुभव घ्या वेगवेगळे दृष्टिकोन अवगत करा, आणि हे सगळं आतमध्ये खोल झिरपू द्या. जितकं जास्त ते झिरपेल तितके तुम्ही समृद्ध व्हाल आणि मग व्यक्त होणं ही एक मजा आहेअसे मत प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक मंगेश कदम यांनी व्यक्त केले. (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे येथील कलापिनी संस्थेचा 46 वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. त्यावेळी मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत यांच्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

लीना भागवत म्हणाल्या, “शिखर गाठलं की त्याला पायथा समजायचं आणि पुढे जायचं. कारण शिखरापाशी तुम्ही थांबलात तर उतार सुरू होतो.”

कार्यक्रमात व्यासपीठावर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक प्रमुख पाहुणे , म्हणून उपस्थित होते. अॅड श्रीराम कुबेर आणि अॅड रवींद्र दाभाडे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नाटक करताना करायच्या. पाळायच्या आणि शिकायच्या सगळ्या गोष्टी रोजच्या आयुष्यात पण किती उपयुक्त ठरतात. हे त्यांच्या दोघांच्या सगळ्याच मुद्द्यांवरून स्पष्टपणे कळलं.(Talegaon Dabhade) गरजा सीमित ठेवायच्या आणि कोणाशीही तुलना करायची नाही. तर तुम्हाला नाटक करणं शक्य आहे. मंगेश कदम यांनी मांडलेला हा मुद्दा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात उपयोगी पडतो.

लीना ताईंच्या सहज सुंदर बोलण्यानी आपल्या घरातलं कोणीतरी आपल्याला समजावून सांगतंय असं वाटत होतं. त्या दोघांच्या वागण्यात प्रचंड साधेपणा आणि आपलेपणा होता. कार्यक्रमात घडणाऱ्या लहान सहन गोष्टींची ते दखल घेत होते.

Alandi : आळंदी पोलिसांची स्मशानभूमी मध्ये दारू पिणाऱ्यांवर कारवाई

शास्त्र आणि उत्स्फूर्तपणा या दोन्ही गोष्टींचा समतोल राखून कोणतीही कलाकृती रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी होते हे या दोन्ही मान्यवर कलाकारांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलं.

चांदणी पांडे, निधी पारेख, डॉ. अश्विनी परांजपे, प्राची गुप्ते, डॉ. प्राची पांडे यांनी दिनेश कुलकर्णींनी कलापिनीवर रचलेले आणि संपदा थिटे यांनी संगीतबद्ध केलेले स्वागतगीत सादर केले. स्वागत कलापिनीच्या कार्यध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे आणि प्रास्ताविक कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांनी केले.(Talegaon Dabhade) कलापिनीतील योगदानाबद्दल , तसेच शष्ट्यब्दिपूर्ती निमित्त कलापिनीचे सचिव हेमंत झेंडे, खजिनदार. श्रीशैल गद्रे, अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पूजा डोळस यांनी मानपत्रांचे वाचन केले. सत्कारार्थींनी कलापिनीमध्ये करत असलेले कामाचा व्यावसायिक कामे करताना देखील उपयोग होतो असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली.

विजयकुमार सरनाईक यांनी कलापिनीच्या कार्याचा गौरव केला आणि अधिकाधिक मदतीचे आश्वासन दिले.

याप्रसंगी कलापिनी कला गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अंजली सहस्त्रबुद्धे आणि माधुरी ढमाले यांनी त्याची सूत्र सांभाळली. यामध्ये बाल भवन सितारा- इरा कर्पे आणि ऋग्वेद आपटे, कुमार भवन सितारा- शांभवी जाधव आणि अवधूत शेवाळे तसेच बालकलाकार- ऋग्वेद अरणके, महिला मंच सखी पुरस्कार – लीना परगी आणि विद्या अडसुळे , प्रोत्साहन पुरस्कार-  दिपाली जोशी, हास्य योग सितारा – हेरंब बेडेकर आणि संपदा नातू, कै.पुष्पलता अरोरा पुरस्कार-  मनीषा शिंदे, कै. सुनीता घाणेकर कला गौरव पुरस्कार- सुप्रिया खानोलकर, कै. गोदावरी भाभी, कै. विष्णू भाई शहा सेवाभावी कार्यकर्ता पुरस्कार रवींद्र पांढरे आणि रश्मी पांढरे यांना प्रदान करण्यात आला. नुकतंच झी नाट्य गौरवचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचं नामांकन मिळवलेली कलापिनीची कलाकार सायली रौंधळ हिचाही गौरव यावेळी करण्यात आला.

डॉ.विनया केसकर यांनी कार्यक्रमाचे नेटकेसूत्रसंचालन केले. डॉ.मीनल कुलकर्णी यांनी आभार मानले. लीना भागवत आणि मंगेश कदम यांची मुलाखत अंजली कऱ्हाडकर आणि विराज सवाई यांनी घेतली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना महिला मंचने तयार केलेले रंगीबेरंगी फुलांचे सुंदर गुच्छ भेट देण्यात आले. या सुंदर कार्यक्रमाचे संयोजन अंजली सहस्त्रबुध्दे आणि अनघा बुरसे यांनी सुंदर केले.

त्यांना त्यासाठी राखी भालेराव, मधुवंती रानडे, ज्योती ढमाले आणि छाया हिंगमिरे यांनी उत्तम साथ केली. कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी अभिलाष भवार, प्रतीक मेहता, शार्दूल गद्रे, (Talegaon Dabhade) आदिती आपटे, स्वच्छंद, चैतन्य जोशी, चेतन पंडित, हृतिक पाटील, प्रणव केसकर, सायली रौंधळ ,संदीप मन्वरे, विनायक काळे तसेच कलापिनी महिला मंच यांनी प्रयत्न केले. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलापिनी वरील प्रेम व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.