Talegaon Dabhade News: चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Talegaon Dabhade News: 74th Independence Day celebrated at Chaitanya International School कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

एमपीसी न्यूज- इंदोरी येथील चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर, संचालक त्यागराज शेवकर, पालक बाळासाहेब ढोरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, अध्यापक वृंद, उपस्थित होते.

भगवान शेवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी झेंडागीत व राष्ट्रगीताचे गायन केले. शेवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, अध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.