Talegaon Dabhade: रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रम

तळेगाव शहरातील सर्व शाळांमधील दहावीमध्ये प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सेवाधाम वाचनालय येथे क्लबचे अध्यक्ष रो. संतोष शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी सर्व सभासद उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तळेगाव स्टेशन येथील राजगुरव कॉलनीमध्ये दिशादर्शक फलक तसेच राजगुरव कॉलनी ही सीसीटिव्ही अंतर्गत करण्यात आली. याप्रसंगी राजगुरव कॉलनी मधील नागरिकांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे आभार व्यक्त केले.

तळेगाव शहरातील सर्व शाळांमधील दहावीमध्ये प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ अतिग्रे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो विलास काळोखे, नारायण शिंदे, आनंदा देशमुख, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, दिलीप राजगुरव आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार शेळके यांनी मावळातील सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी आवाहन केले. त्यामध्ये रोटरी क्लबने तालुक्यातील 25 शाळा डिजिटल करण्यासाठी योगदान देणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संतोष शेळके यांनी केले. सूत्रसंचालन सचिव दीपक फल्ले यांनी केले. आभार महादेव वर्तल यांनी केले. शरयू देवळे, सुरेश शेंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

या कार्यक्रमासाठी संजय मेहता, रेश्मा फडतरे, शाईन शेख, नितीन शहा, संतोष परदेशी, विजय कदम यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.