Talegaon dabhade News: महिलेच्या गळ्यातले पाच तोळ्यांचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – तळेगाव शहरातील (Talegaon dabhade News) सराफ गल्लीत दोन चोरट्यांनी एका महिलेचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री साडेआठ वाजता घडली.

Chakan News: तरुणाला मारहाण करून मोबाईल, रोकड लांबविली

याप्रकरणी महिलेने दोन अज्ञातांच्या (Talegaon dabhade News) विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सराफ गल्लीत एका दुकानासमोर थांबल्या होत्या. तिथे असलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.