Minor girl : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमपीसी न्यूज  – बालघरेवस्ती चिखली येथे 15 वर्षीय मुलीला लग्नाचे (Atrocities on a minor girl)  आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी नऊ आठवड्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ही घटना फेब्रुवारी ते एप्रिल 2021 या कालावधीत घडली. रजत ( रा. बालघरे वस्ती, चिखली, पूर्ण नाव, माहिती समजू शकली नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सोमवारी (दि. 13) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 15 वर्षीय मुलीसोबत (Atrocities on a minor girl) आरोपीने मैत्री केली. ओळख वाढवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून हा प्रकार केला. यामध्ये मुलगी नऊ आठवड्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.