Talegaon Dabhade : धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेला 64 लाखांचा नफा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade)
येथील धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या पतसंस्थेला 64 लाख रुपये नफा झाला असून सर्व सभासदांना 9 टक्के लाभांश सर्वसाधारण सभेत घोषित करण्यात आला. 
दत्ताशेठ शिंदे, दत्ताशेठ पिंजन, शंकरराव शिंदे, संजय शिंदे, कैलास चव्हाण, केशव कुल, काशिनाथ निंबळे, पोपटराव भेगडे, मनोहर पगारे, दत्तात्रय साळुंखे, सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक कर्मचारी सर्व दैनंदिन प्रतिनिधी आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे (Talegaon Dabhade) स्वागत अमर खळदे यांनी केले. लेखापरीक्षण अहवाल विनोद टकले यांनी सभेचे अध्यक्ष विजय शेटे यांनी आपल्या मनोगतमध्ये पतसंस्था कशी प्रगतीपथावर आहे व प्रगती पथावर असताना 23 वर्ष पतसंस्थेने ऑडिट वर्ग ‘अ’ला पतसंस्थेच्या हितासाठी काही कर्जदारांवर कडक कारवाई करावी लागली. ही कारवाई करत असताना सभासद हा पतसंस्थेचा मालक असताना आम्हालाही कारवाई करताना फार दुःख झाले, अशी भावना व्यक्त केली. सर्व सभासदांना लाभांश हा 9% घोषित केला.
पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले यांनी सांगितले, की पतसंस्थेचे उद्दिष्ट हे गरजू लोकांना कष्टकरी लोकांना व्यापारी बनवणे व उद्योजक बनवणे हेच आहे. पतसंस्थेचे खजिनदार संतोष परदेशी यांनी आभार व्यक्त करताना सर्व ठेवीदार कर्जदार, सभासद, कर्मचारी वर्ग, दैनंदिन प्रतिनिधी यांचे आभार मानले व असेच प्रेम सदैव पतसंस्थेवर ठेवाल असा विश्वास व्यक्त केला.
https://youtu.be/NfPJSr_DJ2E

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.