Talegaon Dabhade : तळेगाव रोटरीच्या वतीने 488 विद्यार्थ्यांचे धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade )आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवलाख उंबरे आणि शिवणे येथील दोन शाळांमधील एकूण 488 विद्यार्थ्यांना धनुर्वात प्रतिबंधक लस मोफत टोचण्यात आली.

ही मोहीम एक आणि दोन डिसेंबर रोजी राबविण्यात आली. तसेच रुबेला लसीकरण संदर्भात पालकांना प्रबोधन करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि 1)रोजी श्रीराम विद्यालय,नवलाख उंब्रे आणि शनिवार (दि 2) रोजी संत तुकाराम विद्यालय शिवणे या ठिकाणी ‘शालेय विद्यार्थ्यासाठी मोफत धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण’ कार्यक्रम पूर्ण केला. या दोन्ही शाळा मिळून एकूण 488 विद्यार्थांना लसीकरण केले गेले. तसेच रुबेला लसीकरण संदर्भात पालकांना प्रबोधन करण्यात आले.

Pimpri : तुनवाल ई-मोटर्स… सर्वात स्वस्त ई बाईक्स; विविध वयोगटांसाठी 14 मॉडेल्स उपलब्ध

अध्यक्ष उद्धव चितळे,उपाध्यक्ष (Talegaon Dabhade )कमलेश कार्ले,सचिव श्रीशैल मेन्थे यांच्या पुढाकारातून प्रकल्प प्रमुख युवराज काकडे यांच्या विशेष सहकार्यातून व डॉ नेहा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात आला

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन आणि क्लबचे अध्यक्ष रो.उद्धव चितळे,सचिव रो.श्रीशैल मेंथे,फर्स्ट लेडी अर्चना चितळे,रो.संजय अडसूळ,रो.लेले,रो.विश्वनाथ मराठे,रो विकास उभे,मेडिकल डायरेक्टर डॉ. ज्योती मुंडर्गी, डॉ. नेहा कुलकर्णी मॅडम, त्यांची मेडिकल टीम आणि रो. मथुरे काका यांचे सहकार्य लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.