Talegaon Dabhade : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे विश्वस्त हभप पंढरीनाथ शेटे यांचे निधन

एमपीसी न्यूज- मावळ तालुका वारकरी सांप्रदाय (Talegaon Dabhade)मंडळाचे विश्वस्त,शेटेवाडी येथील प्रगतशील शेतकरी हभप पंढरीनाथ (बुवा )बळवंत शेटे(वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक विशाल शेटे, विराट शेटे यांचे ते वडील होत.

Alandi: श्री क्ष्रेत्र देहू ते श्री क्षेत्र आळंदी पर्यंत पर्यावरण जनजागृती पदयात्रा
कै. पंढरीनाथ शेटे यांना आध्यात्मिक वसा आणि वारसा होता. गुरुवर्य श्री गोविंदजी डांगे महाराजांचा त्यांना सहवास लाभला होता. धार्मिक वृत्तीचे असलेले शेटे यांनी स्वखर्चाने शेटेवाडी येथे मुकाई मांजर देवीचे मंदिर उभारले. दररोज त्यांचे सकाळी अकरा वाजेपर्यंत मौन व्रत असायचे.

श्रावण महिना, नवरात्र ते दसरा आणि अधिकमासामध्ये त्यांचेपूर्णवेळ मौन व्रत असायचे.उत्कृष्ट हार्मोनियम आणि पखवाज वादक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांना कुस्तीचीही आवड होती. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी जिल्ह्यातील अनेक आखाडे गाजवले.
नामांकित पैलवान म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.