Talegaon Dabhade : तळेगाव नगरीत संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानिमित्त नृत्य नाट्य सादर

कलापिनी व सृजन नृत्यालयाची दैवी अनुभूती देणारी कलाकृती

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील श्री विठ्ठल मंदिरात (Talegaon Dabhade) श्री संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्या निमित्त विठ्ठल मंदिर संस्थानातर्फे कलापिनी व सृजन नृत्यालय यांनी “भाग्ये देखिला तुका” हे नृत्य नाट्य सादर केले. तुकाराम महाराजांच्या  निवडक 10 अभंगांवर आधारीत कार्यक्रम पाहताना भाविक रंगून गेले.

विठ्ठलाची भुमिका जागृत कुमठेकर व संत तुकाराम महाराजांची भुमिका मिहीर देशपांडे यांनी अप्रतिम वठवली. त्यांच्या दर्शनाने प्रेक्षक भारावुन गेले.

नृत्यनाट्याचे दिग्दर्शन डाँ. मीनल कुलकर्णी यांनी तर संगीत दिग्दर्शन सौ. संपदा थिटे यांनी केले. विराज सवाईयांनी  सूत्र संचालन केले. संगीत साथ मंगेश राजहंस (तबला) , पवन झोडगे (पखवाज ), प्रवीण ढवळे (तालवाद्य) यांनी केली. गायक कलाकार स्वतः संपदा थिटे, सहकलाकार प्रणव केसकर, अंकूर शुक्ल, निधी पारेख, डाँ.प्राची पांडे, लीना परगी, डाँ सावनी परगी, आरती जाधव यांनी अभंग गायन केले.

Talegaon Dabhade : सोमाटणे टोल नाक्यावर चारचाकी वाहनांना मिळणार दिलासा

नृत्य कलाकार शरयू पवनीकर, प्रणोती काळे, पूनम बोराटे, सिध्दी शहा, सुप्रिया नायर, जान्हवी सरोदे, तेजस्विनी गांधी, आदिती अरगडे, शामली देशमुख, क्षितिजा बवले, मैत्रेयी कोल्हापूरे, (Talegaon Dabhade) अंकीता कुचेकर, स्फुर्ती शेट्टी व डाँ. मीनल कुलकर्णी यांनी उत्तम नृत्यरचना सादर केल्या. कामिनी जोशी, यांनी सादर केलेली  ‘ पंढरपूरला चाललेली आवा ‘  सर्व रसिकांना विशेष भावली.

प्रशांत धुळेकर, दिपांशू सिंग, ऋषिकेश कठाडे, व रोहीत धुलगुडे यांनी सुंदर वारकरी न्रुत्य सादर केले. रंगभूषा मुक्ता भावसार यांची होती. मा. संतोष खांडगे सचिव विद्या प्रसारक मंडळ तळेगाव व सौ. रजनीगंधा खांडगे यांचे हस्ते सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी कलापिनी विश्वस्त डाँ. अनंत परांजपे, ह.भ.प. माऊली दाभाडे विठ्ठल मंदिर संस्थान मंचावर उपस्थित होते.

 

कार्यक्रम इतका रंगला की साक्षात तुकोबाराय मंदीरात अवतरले (Talegaon Dabhade) अशी अनुभूती सर्व उपस्थित भाविकांना मिळाली. भाविक रसिकांना खिळवून ठेवणारा हा बहारदार कार्यक्रम कलाकारांच्या संगीतमय नृत्य आरती व महाप्रसादाने संपन्न झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.