Talegaon: कंपनीच्या मोकळ्या जागेतून 10 लाखांचे साहित्य चोरले; एकास अटक

एमपीसी न्यूज -कंपनीच्या मोकळ्या जागेतून दहा लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरून (Talegaon)नेले. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि. 4) मध्यरात्री तळेगाव एमआयडीसी मधील श्री समर्थ टेक प्रोसेस इंजिनिअरींग कंपनीच्या मोकळ्या जागेत घडली.
संजय धर्मा साह (वय 37, रा. मिंडेवाडी, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे( Talegaon)अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अर्पित नारायण इंगळे (वय 37, रा. चऱ्होली, पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

PCMC : महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दर गुरूवारी ”सायकल टू वर्क थर्सडे” उपक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीच्या मालकीच्या मोकळ्या जागेत काही कंपन्यांचे साहित्य ठेवले होते. त्यातील 10 लाख रुपये किमतीचे 20 टन मटेरीअल आरोपीने दोन टेम्पो मधून चोरून नेले. पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

https://www.youtube.com/watch?v=xuetkF0jsmg&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.