Talegaon News : स्थानिकांनी फास्टॅगचा नाही तर कॅश लेनचा वापर करावा – टोल हटाव संघर्ष समिती

0

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील स्थानिकांनी फास्टॅगचा वापर करू नये कॅश लेनमधून टोल माफी घ्यावी. सोमाटणे टोल नाका व वरसोली टोल नाका येथे फास्टटॅग नसणाऱ्या वाहन चालकांसाठी व स्थानिक रहिवाशांच्या वाहनांसाठी वेगळी कॅश लेन सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे स्थानिक वाहन चालकांनी कॅश लेनमधुन गेल्यास त्यांना संपूर्ण टोल माफी झाली असल्याने फास्टॅग मधून स्थानिकांनी वाहन नेऊ नये, असे आवाहन टोल हटाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

फास्टॅगची मुदत 15 सप्टेंबरला संपल्या नंतरही अनेक वाहन चालकांनी फास्टॅग बसविला नाही, अशा वाहन चालकांसाठी व स्थानिक वाहन चालकांसाठी सोमाटणे व वरसोली टोल नाक्यावर वेगळी कॅश लेन सुरु आहे, त्या लेनमध्ये स्थानिक वाहनांचा टोल घेण्यात आला नसल्याचे आयआरबी कंपनी पदाधिकारी यांनी स्पष्ट केले.

सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे आजही स्थानिकांना टोल माफी देण्यात आली. वरिष्ठ पातळीवर टोल हटवण्याबाबत पुढील कारवाई जोपर्यंत होत नाही तो पर्यंत मावळ तालुक्यातील रहिवाशांनी सोमाटणे व वरसोली टोल नाक्यावर टोल भरू नये, असे जनसेवा विकास समितीचे संथापक अध्यक्ष व टोल हटाव कृती समितीचे प्रमुख किशोर आवारे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.