Talegaon News : स्वीट मार्टमधून स्वीट घेऊन घरी निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे स्टेशन येथील एका स्वीट मार्टमधून स्वीट घेऊन घरी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील  70 हजारांचे मंगळसूत्र अनोळखी चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.

सुजाता दिलीप निळे (वय 49, रा. वराळे फाटा, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी तळेगाव स्टेशन येथील वृंदावन स्वीट मार्टमधून स्वीट घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एक अनोळखी चोरटा आला. त्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचले. त्यातील अर्धे मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.