Talegaon : पुतणीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अश्लील मेसेज टाकणा-या चुलत्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पुतणीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अश्लील मेसेज टाकून तिची बदनामी करणा-या चुलत चुलत्यावर शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत घडला. यावर सायबर सेलने तपास करून मंगळवारी (दि. 21 जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 20 वर्षीय पुतणीने शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 20 वर्षीय चुलत चुलत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी तळेगाव दाभाडे येथे पदवीच्या दुस-या वर्षात शिक्षण घेत आहे. आरोपी चुलत चुलत्याने फिर्यादी तरुणीच्या फेसबुक अकाउंटवरून अश्लील मेसेज केले. यानंतर, तरुणीच्या चुलत भावाने तरुणीला याबाबत विचारले असता तिला याबाबत काहीही माहिती नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तरुणीने चुलत भावासोबत पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडे धाव घेतली.

सायबर पोलिसांनी तपास करून आरोपी निष्पन्न केला. याबाबत तरुणीने शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली असून आरोपी चुलत्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (क), 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.