Talegon dabhade: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्टेशन, महत्वाच्या चौकात औषध फवारणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन आणि स्टेशन परिसरातील महत्वाचे चौक आज (गुरुवारी) धुवून काढले. या वेळी औषध फवारणीही करण्यात आली.

आमदार सुनील शेळके, तळेगाव नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक सुशील सैंदाणे, निखील भगत, रोहित लांघे, संतोष शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड तसेच रेल्वे अधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळेगावातील अनेक कंपन्यांनी कामगारांना सुट्टी दिल्याने कामगार आपल्या गावी जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर नागरिकांची वर्दळ आहे. या परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी रेल्वे प्लॅटफार्म आणि परिसर धुवून काढून औषध फवारणी करण्यात आला. त्याचबरोबर स्टेशन परिसरातील स्टेशन चौक, छत्रपती शिवाजी चौक, मराठा क्रांती चौकही धुवून काढून औषध फवारणी करण्यात आली.

आमदार सुनील शेळके म्हणाले, रेल्वेमध्ये प्रवास करताना नागरिकांनी सॅनिटायर बरोबर ठेवावे, मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणे व गर्दीत काळजी घ्यावी. कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाला घाबरुन न जाता त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे हाच मोठा उपचार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.