Tata Acquired Air India : एअर इंडियाची मालकी ‘टाटा’कडे, 68 वर्षांनंतर पुन्हा जबाबदारी

एमपीसी न्यूज – एअर इंडियाच्या मालकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. टाटा सन्सकडे 68 वर्षांनंतर पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यात टाटा सन्ससोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावत बाजी मारली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीगटाने एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे सोपवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय पातळीवरून निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

टाटा समूहाने 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. त्यानंतर भारत सरकारने 1953 साली आपल्या ताब्यात घेतली होती. एअर इंडिया विकण्याची प्रक्रिया जानेवारी 2020 पासून सुरु झाली होती. मात्र कोरोना संकटामुळे यात विलंब झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.