Pune News : विक्रीसाठी कोकेन जवळ बाळगणा-या दोन नाजेरियन इसमांना पुणे विद्यापीठासमोरून अटक

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी 10 ग्रॅम 890 मिलीग्रॅम कोकेन जवळ बाळगल्याप्रकरणी दोन नाजेरियन इसमांना पुणे विद्यापीठासमोरून अटक करण्यात आली आहे. बुधवारी (दि.29) गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने ही कारवाई केली.

नन्दी ओडीनका हेनरी (वय 37, रा. पिंपळे गुरव, मुळगाव नायजेरिया) आणि ओकेके इन्फीचिकु जॉन (वय 29, रा. पिंपळे गुरव, मुळगाव नायजेरिया) असे अटक करण्यात आले आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक विद्यापीठ परिसरात पेट्रोलिंग करत असताना विद्यापीठाच्या गेट समोर दोन इसम संशयित रित्या थांबले होते. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यात 10 ग्रॅम 890 मिलीग्रॅम कोकेन जवळ बाळगले होते. त्यांच्या कडून पाच मोबाईल, दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 80 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरोधात चर्तु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.