Hinjawadi Crime News : जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याने 10 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश करून तारेचे कंपाऊड तसेच नाम फलक तोडला. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 जून रोजी घडली असून याबाबत 2 नोव्हेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू दत्तू भिलार, नागेश बाळू भिलार, एक महिला आरोपी (तिघेही रा. कासारअंबोली, ता. मुळशी), रवींद्र राजेंद्र ससार, मल्हारी राजेंद्र ससार, राजेंद्र खंडू ससार, विजय खंडू ससार आणि तीन महिला आरोपी (सर्व रा. सूसगाव, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गोविंद एकनाथ धोंगडे (वय 61, रा. एमआयडीसी पाइपलाइन रोड, रावेत) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सूसगाव येथे दोन गुंठे जागा खरेदीखत करून 1999 मध्ये विकत घेतली. या जागेला त्यांनी तारेचे कुंपण घातले होते. 15 जून 2021 रोजी आरोपी आपसांत संगनमत करून तिथे आले. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने ते कुंपण व फिर्यादी यांच्या नावाचा फलक तोडून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.