Diwali Special Offers : शिवम् ज्वेलर्समध्ये दिवाळीनिमित्त मजुरीवर 40 टक्के सूट, 15 नोव्हेंबरपर्यंत ऑफर मर्यादित

एमपीसी न्यूज – 25 वर्षांची सुवर्ण परंपरा असलेल्या शिवम् ज्वेलर्समध्ये दिवाळीनिमित्त खास ऑफर देण्यात आली आहे. शिवम् ज्वेलर्समध्ये दागिन्यांच्या मजुरीवर 40 टक्के सूट देण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर 2021 पर्यंतच ही ऑफर मर्यादित आहे. शिवम्’ने शंभर टक्के शुद्ध सोन्याची हमी देत आतापर्यंत ग्राहकांशी विश्वासाचे नातं जपले आहे.

सतत 25 वर्ष ग्राहकांना 100 टक्के शुद्ध आणि हॉलमार्क असलेले सोन्याची सेवा पुरवणाऱ्या शिवम् ज्वेलर्सने 25 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. याठिकाणी 100 टक्के हॉलमार्क असलेले ए टू झेड व्हरायटीचे दागिने, रेग्युलर दागिने उपलब्ध असून सोने खरेदीसाठी या दालनाला ग्राहक पसंती देत असतात. टेम्पल ज्वेलरीसाठी शिवम् ज्वेलर्स विशेष प्रसिद्ध असून अगदी पुण्यातून सुद्धा यासाठी मोठी मागणी होत असते.

सोने खरेदी म्हटलं की जास्त डिझाइन्स पाहता याव्यात अशी ग्राहकांची इच्छा असते. शिवम् ज्वेलर्सकडून याची खास काळजी घेण्यात आली असून ग्राहकांना सुरक्षितपणे अमर्याद डिझाइन्स पाहता येतात.

शिवम् ज्वेलर्समध्ये टेम्पल ज्वेलरी, कलकत्ता ज्वेलरी तसेच विविध व्हरायटीचे दागिने उपलब्ध आहेत. दालनाला भेट देण्यासाठी नागरिकांसाठी विशेष फोन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यामाध्यमातून त्यांना वेगळा वेळ दिला जातो.

याठिकाणी ग्राहकांना बिल भरण्यासाठी ऑनलाइनसह विविध पर्यायांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. 100 टक्के शुद्ध आणि हॉलमार्क असलेले सोने खरेदीसाठी ग्राहकांचे पहिल्या पसंतीचे ठिकाण असून शिवम् ज्वेलर्सची सेवा आणि विश्वासहार्यतेबद्दल ग्राहक नेहमीच समाधान व्यक्त करतात.

शिवम् ज्वेलर्सच्या 1200 चौरस फूट असलेल्या या भव्य दालनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आणि काऊंटर यामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले आहे. दालनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर, मास्क व हॅंड ग्लोव्हज इत्यादी गोष्टी पुरवल्या जातात.

दालनात फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची विशेष काळजी घेतली जाते. दालनात येणाऱ्या ग्राहकांना त्यांची वाहने पार्किंगसाठी सोय करून देण्यात आली आहे.

शिवम् ज्वेलर्स 25 वर्ष ग्राहकांच्या सेवेत असून त्यांनी सोने विक्रीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आमच्या येथे विविध व्हरायटीचे दागिने उपलब्ध असून शहरातील एक अग्रगण्य दालन म्हणून आमची ओळख आहे. दिवाळीनिमित्त देण्यात आलेल्या सवलतीचा ग्राहकांनी अवश्य लाभ द्यावा असे आवाहन शिवम् ज्वेलर्सकडून करण्यात आले आहे.

संपर्कासाठी पत्ता – शिवम् ज्वेलर्स
साई शिव कॅार्नर, नेहरू नगर
पिंपरी- 411018
संपर्क क्रमांक – (020-27425501/02) / 9373440453

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.