Test Ranking : वर्ल्ड चॅम्पियन न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन टेस्ट रॅकिंगमध्ये अव्वल

एमपीसी न्यूज – पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब न्यूझीलंडने भारताला पराभूत करून आपल्या नावे केला. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन टेस्ट रॅकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. केन विल्यमसन 901 पॉईंट सह टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

मानाची पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप न्यूझीलंडने आपल्या नावे केली या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. यानंतर आसीसीने नुकतीच टेस्ट रॅकिंग जाहीर केली आहे. यामध्ये 901 पॉईंट सह केन विल्यमसन पहिल्या स्थानावर आहे. तर, 891 पॉईंट सह ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. मार्नस लाबूशेन 878 पॉईंट सह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार 812 पॉईंट सह चौथ्या स्थानावर आला आहे. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत अनुक्रमे 759 व 752 पॉईंट सह सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स पहिल्या तर, आर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर पहिल्या स्थानावर आहे तसेच, भरताचा रविंद्र जडेजा आणि आर अश्विन तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

दरम्यान एकदिवसीय क्रिकेट मध्ये पाकिस्तानचा बाबर आझम 865 पॉईंट सह पहिल्या स्थानावर आहे. तर, विराट कोहली आणि रोहित शर्मा प्रत्येकी 857 व 825 पॉईंट सह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कायम आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.