Pune news: तरुणींसोबत ‘डेटिंग’चे स्वप्न पाहणाऱ्या 68 वर्षीय आजोबांना सायबर चोरट्यांचा इंगा, चार लाख लुबाडले

The 68-year-old grandfather, who dreamed of 'dating' with young women, was attacked by cyber thieves, 4 lakhs were stolen from him.

एमपीसी न्यूज – तरुण मुलींसोबत डेटिंग चे स्वप्न पाहणाऱ्या पुण्यातील एका 68 वर्षीय आजोबांना सायबर चोरट्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. मुली पुरवण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी या आजोबांकडून तब्बल पावणे चार लाख रुपये लुबाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या आजोबांनी सायबर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे. 

हे 68 वर्षीय आजोबा पुण्यातील क्वार्टर गेट परिसरात राहतात. अज्ञात व्यक्तीने त्यांना फोनवर संपर्क साधत डेटिंगसाठी मुली पुरवत असल्याचे सांगितले.

त्यासाठी त्यांना वेळोवेळी एका बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडले. आजोबांनीही तरुण मुलीसोबत डेटिंगला जाण्याचे स्वप्न पहात या खात्यावर वेळोवेळी तब्बल पावणे चार लाख रुपये भरले सुद्धा. परंतु आरोपी आणखी पैसे भरा म्हणून त्यांना सांगत राहिले.

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आजोबांनी सायबर पोलिस स्टेशन गाठत फसवणूक झाल्याचे सांगत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.