India Corona Update : 44 दिवसांतील निच्चांकी रुग्णवाढ, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 9 टक्क्यांवर  

गेल्या 24 तासांत 1.86 लाख नवे रुग्ण ; 2,59,459 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 44 दिवसांतील निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली आहे. तसेच, मागील चार दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 9 टक्क्यांवर स्थिरावला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 86 हजार 364 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर, 2 लाख 59 हजार 459 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 2 लाख 59 हजार 459 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक असल्याने देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे‌. देशात सध्याच्या घडीला 23 लाख 43 हजार 152 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आजवर 3 लाख 18 हजार 895 जणांचा बळी घेतला आहे. गेल्या 24 तासांत 3 हजार 660 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.13 टक्के एवढा आहे‌. तर, देशाचा रिकव्हरी रेट 90.34 टक्के एवढा झाला आहे.

देशात चाचण्यांची संख्या वाढली आहे‌. गेल्या 24 तासांत सर्वाधिक नमूने तपासण्यात आले. देशात आजवर 33 कोटी 90 लाख 39 हजार 861 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 20 लाख 70 हजार 508 चाचण्या गुरुवारी (दि.27) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 9 टक्क्यांवर आला असून, मागील चार दिवसांपासून स्थिर आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 10.42 टक्के एवढा झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, रिकव्हरी रेट 90 टक्क्यांपेक्षा अधिक झालं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.