Pune : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महावितरणची यंत्रणा सज्ज

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी गुरुवारी (दि. 23) पुणे परिमंडलअंतर्गत सर्वच भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज आहे. तसेच विविध भागात होणारे वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित व मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे बंद ठेवण्यात येणार आहे.

लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया सुरु होत असल्याने महावितरणच्या सर्व अभियंता व कर्मचार्‍यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी दक्ष राहावे राहावे. वाढत्या उन्हामुळे किंवा अन्य कारणांमुळे वीजयंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात यावे तसेच बिघाड दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर करावेत अशा सूचना पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिल्या आहेत. यासोबतच पुणे परिमंडल अंतर्गत गुरुवारी होणारे विविध भागातील वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व व पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे कामे दि. 23 रोजी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.