India Corona Update : कोरोनाचा विळखा सैल होतोय ! देशातील अॅक्टिव्ह रूग्णसंख्या 250 दिवसांतील निचांकी

एमपीसी न्यूज – देशात सुरू असलेले विक्रमी लसीकरण कोरोना संसर्गाचा विळखा सैल करण्यास मदत करत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजार 423 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्याच्या घडीला 1 लाख 53 हजार 776 एवढे अॅक्टिव्ह कोरोना रूग्ण आहेत. मागील 250 दिवसांतील ही निचांकी अॅक्टिव्ह रूग्णसंख्या आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 42 लाख 96 हजार 237 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 36 लाख 83 हजार 581 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 15 हजार 021 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.21 टक्के एवढा झाला आहे.  ॉ

 

देशात गेल्या 24 तासांत 443 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 58 हजार 880 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. केरळ राज्यात गेल्या 24 तासांत 5 हजार 297 नवे कोरोना रूग्ण वाढले असून 368 रूग्णांचा मृत्यू झाले आहेत.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 61 कोटी 02 लाख 10 हजार 339 नमूने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 10 लाख 09 हजार 045 नमूने तपासण्यात आले आहेत. दररोज होणा-या चाचण्यांच्या तुलनेत नव्यांन वाढ होणा-या रूग्णसंख्येत मोठी घट नोंदवली आहे. फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच एवढी मोठी घट झाली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 106 कोटी 85 लाख 71 हजार 879 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.