Akurdi News : साद सोशल फाऊंडेशनतर्फे अंध बांधवांना दिवाळी फराळ वाटप

एमपीसी न्यूज – तिमिरातून तेजाकडे जाण्याचा प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी देशभरात हा सण आनंदाने साजरा केला जातो. अंध कुटुंबियांच्या सोबत दिवाळी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम साद सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आकुर्डी येथे घेण्यात आला.

पिंपरी-चिंचवड पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सर्व सामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा असल्याचे ते म्हणाले. आज माझ्या अंध बांधवाच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाल्याचे कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले.

आकुर्डी येथील श्री खंडोबा सांस्कृतिक भवन येथे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.  दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात एक हजार अंध कुटुंबियांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी एमपीसी न्यूजचे सहयोगी संपादक अनिल कातळे, उद्योजक राजेश पंगल, सूर्या इलेकट्रोनिकचे रमेश चौधरी , डॉ. श्याम अहिरराव , डॉ.महेश शेटे , प्रशांत थोरवे, अतिश बारणे, शिवा बहिरट , लतिफ खान, रवी घोडेकर , दस्तगीर मणियार, परेश मोरे, हाजी  भाई, प्रभाकर गुरव,संजय बांदल, प्रवीण जाधव,अनिल दळवी, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम संतोष जाधव, किशोर जैद सहकारी उपस्थित होते.

पोलिस उपायुक्त मंचक इप्पर म्हणाले, “दिवाळी हा दिव्यांचा उत्सव हा उत्सव सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. समाजातील अंध  बांधवांच्या जीवनात ही दिवाळी असाच प्रकाश घेऊन यावी, यासाठीच साद सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून अंध कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. हा उपक्रम खरच खूप छान आहे. जेव्हा आपण समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करून काम करतो. त्यात आपण नेहमीच यशस्वी होतो आणि अशा घटकाचे विचार करणारे नेतृत्व इरफान सय्यद यांच्या रूपाने निर्माण होत आहे.

समाजातील हा अंध बांधव ह्याच्या मध्ये एक खूप मोठी शक्ती असते. त्याचा वापर केला तर ते या जीवनात खूप मोठ्या पदावर जाऊ शकतात किंवा यशस्वी होऊ शकतात. आजही माझ्या सारख्या प्रशासकीय सेवेत काम करणारे अनेक अधिकारी आहेत. त्याच्या सोबत अंध बांधव दीव्यांग बांधव सुध्दा आहेत. आपण ही अशाच प्रकारे आपल्यातील कलागुणांना प्रोत्साहन देऊन खूप यशस्वी पणे आयुष्य जगावे ही सदिच्छा त्यांनी व्यक्त करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या”.

“सर्व सामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा आहे. ” दिव्यांगाचे आशिर्वाद हीच आमची उर्जा ” ह्याच आशिर्वादाच्या जोरावर गेल्या 7 वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम अखंड चालु आहे. मोहननगर येथे  5 ते 10 लोकांपासुन चालु केलेला हा सामाजिक उपक्रमात आज  अनेक दिव्यांग बांधव आनंदाने सहभागी होऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्याची संधी आम्हाला देतात. आज माझ्या अंध बांधवाच्या  चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली”, असे मत साद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.

साद सोशल फांडेशनच्या वतीने गेली 7 वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अंध कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटप हे सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना सर्वात जास्त समाधान होत असल्याचे सांगून समाजातील विविध स्तरातील गरजूंना केलेली मदत हे ख-या अर्थाने समाजऋण फेडण्याचे काम आहे, असेही सय्यद यांनी सांगितले.

मागील 7 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही अंध बांधवांच्या आशीर्वादाने व सहकारी मित्र यांच्या सहकार्याने राबवत आहोत. ह्या बांधवांनी दिलेले आशिर्वाद हीच माझी उर्जा आहे. ज्या उर्जेमुळेच मला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. अंध कुटुंबियांच्या चेह-यावरील पाहिलेला आनंद हा चिरकाल राहण्यासाठी साद सोशल फाऊंडेशनचे सर्व सहकारी सतत प्रयत्नशील राहतील,अशी ग्वाही  इरफान सय्यद यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. पत्रकार भूषण नंदुरकर यांनी आभार मानले. नागेश व्हनव्हते , उज्वला गर्जे , अरुण जोगदंड , प्रितेश शिंदे, चंदन वाघमारे , श्रीकांत सुतार ,  धीरज चव्हाण , समर्थ नायकवडे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.