Ashok Mangal : रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत फेरीवाल्यांना हटविणे आवश्यक – अशोक मंगल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांचे काम सुरु असताना रस्ताच्या कडेला फेरीवाले उभे असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यासाठी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत फेरिवाल्यांना हटविले पाहिजे अशी मागणी जागरुक नागरीक मंचांचे संयोजक अशोक मंगल (Ashok Mangal) यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, रस्त्याचे काम एका आठवड्याचे आहे. त्याला जास्तीत-जास्त एक महिना अधिक लागतो. काम वेळेत अजिबात पूर्ण होत नाही. रस्त्यावर प्रचंड रहदारी असते. काम पूर्ण होईपर्यंत तो रस्ता एकमार्गी असू शकतो. काम पूर्ण होईपर्यंत रस्त्याच्या कडेला असलेले फेरीवाले अतिक्रमण कोणत्याही ठिकाणी हलवता आले असते. पण, तसे होत नाही. फेरीवाल्यांसमोर गाडी रस्त्यावर उभी करुन ग्राहक थांबतात. त्यामुळे रस्ता अरुंद होतो. परिणामी, वाहतूक कोंडीत भर पडते.

Talegaon Rape Case : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकजण अटकेत

ठेकेदारांना रात्री काम करण्यास सांगू शकत नाही का? वाहतुकीचे मार्गदर्शन आणि नियंत्रण करण्यासाठी एक वाहतूक पोलीस नियुक्त करणे आवश्यक आहे. तसेच ऑटो क्लस्टर येथे कंत्राटदाराची मशिनरी पाच वर्षांपासून कोणतेही काम न करता उभी आहे, याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.