Hinjewadi News : जेवणात अंडे कमी दिल्याने भांडण

एमपीसी न्यूज – जेवणात एक अंडे कमी वाढले, या कारणावरून भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या बोटाला चावा घेऊन जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 3) रात्री हिंजवडी येथे घडली.

चंद्रकांत दत्तात्रय अभंग (वय 33, रा. हिंजवडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज सर्वजीत सिंग (वय 35, रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास शिवतेजनगर हिंजवडी येथे आरोपी आणि त्याची पत्नी जेवण करत होते. जेवणात एक अंडे कमी वाढले या कारणावरून आरोपीने भांडण केले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपीने त्यांच्या बोटाला जोरात चावा घेऊन गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.