Pune Crime News : घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपसून फरार आरोपीला अटक 

एमपीसी न्यूज – घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपसून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मार्केट यार्ड पोलिसांनी शुक्रवारी (दि.04) ही कारवाई केली. 

असिफ ऊर्फ काळया आयुब शेख (वय 29, रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हा बैल बाजार मार्केटयार्ड पुणे येथील मोकळ्या मैदानात आला असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले चौकशीअंती त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चेतन भोसले करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.