Pune News : स्वारगेट बस स्थानका समोरुन अपहरण केलेल्या चार वर्षीय मुलीला दहा तासांत शोधून केले पालकांच्या स्वाधीन 

एमपीसी न्यूज – स्वारगेट बस स्थानका समोरुन अपहरण केलेल्या चार वर्षीय मुलीला दहा तासांच्या आत शोधून पालकांच्या स्वाधीन केले. स्वारगेट पोलिसांनी ही कामगिरी केली. सासवड बस स्थानकावरुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू लक्ष्मण जाधव (वय 36, रा. स्वारगेट) यांच्या चार वर्षीय मुलीचे स्वारगेट बस स्थानकासमोरील पुलाखालून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाकरीता वीस टिम तयार करुन पुणे ग्रामीण, पुणे शहर, पुणे रेल्वे व आसपासच्या जिल्ह्यात कसून तपास केला. तसेच, सोशल मिडीयाव्दारे पुणे शहर व आजुबाजुच्या जिल्हयातील पोलीस स्टेशन व सोशल मिडीयामध्ये प्रसारीत करण्यात आली.

दुपारी तीनच्या सुमारास सासवड येथील एका इसमाने सोशल मिडीयामध्ये प्रसारित झालेल्या बातमीची खात्री करुन सासवड येथे बस स्टॅन्डवर उभे असलेल्या आरोपीसह मुली बाबतची माहिती स्वारगेट पोलिसांना कळवली. माहितीची खात्री करुन स्वारगेट पोलीसांनी दहा तासाच्या आत अपहरण मुलीचा शोध घेवुन मुलीला तिच्या आईवडीलांचे ताब्यात देण्यात आले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.