Pimpri News: सत्ताधारी भाजपने महापौर निधी स्मार्ट सिटीसाठी वळविला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने महापौर निधीतील एक कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीकडे वळविला आहे. त्यातून शहरात एलईडी डेकोरेटिव्ह ट्रॅफिक सिग्नल बसविले जाणार आहेत.

शहरात काही आपत्ती घडल्यास, दुर्घटना, तातडीची कामे करण्यासाठी महापौर निधी ठेवला जातो. बजेटमध्ये महापौर निधीसाठी तरतूद केली जाते. त्यातून आपत्तीच्यावेळची कामे केली जातात. महापालिका परिसरात वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी ट्राफिक सिग्नलमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. महापालिका परिसरात एलईडी डेकोरेटिव्ह ट्रॅफिक सिग्नल बसविण्यासाठी येणा-या एक कोटी खर्चाला प्रशासकीय मान्यता आणि महापौर विकास निधी या लेखाशीर्षातून एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीच्या स्थापत्य विभागामार्फत सिग्नलचे काम प्रगतीपथावर आहे. ट्रॅफिक सिग्नल सुधारणा करण्याचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामासाठी महापौर विकास निधीमधून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीकडे एक कोटी रुपये वळविले आहेत. या खर्चातून सिग्नलचे काम करण्यास महासभेने उपसूचनेद्वारे मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.