Bhosari News : दोन दुकानांमधील सामायिक भिंत फोडून वाईन शॉपमधून दारू पळवली

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरटयांनी एका वाईन शॉपच्या शेजारी असलेल्या दुकानाची सामायिक भिंत फोडून वाईन शॉप मधून दारू चोरून नेली. ही घंटा मंगळवारी (दि. 28) सकाळी गवळीनगर, भोसरी येथे घडली.

सेवक गुरुदासमल अछरा (वय 61, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे गवळीनगर, भोसरी येथे उमेश वाईन शॉप नावाचे दुकान आहे. त्यांनी सोमवारी रात्री दहा वाजता त्यांचे दुकान कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी फिर्यादी यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या एका दुकानाची सामायिक भिंत फोडून चोरट्यांनी वाईन शॉपमध्ये प्रवेश केला. वाईन शॉप मधून 60 हजार 750 रुपये किमतीच्या टॅंगो 90 एमएलच्या 20 ते 25 बॉटल आणि रोख रक्कम चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.