Chikhali News : आईस्क्रीम पार्लर मधून गि-हाईकाने लांबवली दुकानदार महिलेची पर्स

एमपीसी न्यूज – लस्सी पिण्यासाठी व आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी दुकानदार महिलेची पर्स, मोबाइल व रोख रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी एकूण सात हजार 550 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चिखली येथील नेवाळे वस्ती येथे आर. एस. डेअरी या आईस्क्रीम पार्लर येथे मंगळवारी (दि. 9) दुपारी हा प्रकार घडला.

स्नेहा दुर्गेश बैस (वय 32, चिखली) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नेवाळे वस्ती येथे आर. एस. डेअरी नावाचे आईस्क्रीम पार्लर आहे. फिर्यादी त्यांच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांना लस्सी देऊन आईस्क्रीम मोजून देत होत्या. त्यावेळी तेथे लस्सी पीत असलेल्या व आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी ग्राहकांपैकी कोणीतरी फिर्यादी यांची लेडीज पर्स, मोबाईल व रोख रक्कम, असा एकूण सात हजार 550 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.